निरोप (नाम)
एखाद्या उद्देश्याने सांगितलेली किंवा कळवलेली किंवा लिखित वा सांकेतिक एखादी महत्त्वाची गोष्ट.
दोरी (नाम)
कापूस, झाडांच्या साली किंवा तंतू इत्यादींपासून वळलेली बांधावयाची वस्तू.
अरण्य (नाम)
जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण.
सातू (नाम)
गव्हासारखेच एका प्रकारचे पीक.
पार्वती (नाम)
जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
अनुचित (विशेषण)
न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
लक्ष्मी (नाम)
विष्णूची पत्नी मानली जाणारी संपत्तीची देवता.
व्याकूळ (विशेषण)
शारीरिक, मानसिक वेदनांनी पीडित झालेला.
हळवा (विशेषण)
सहज दुखावला जाईल असा.
पाश (नाम)
रश्शी, तार इत्यादींचा फेरा ज्याच्या मध्ये आल्यावर जीव अडकून जातो आणि जर आवळला गेला तर मरूदेखील शकतो.