बाडबिस्तरा (नाम)
उपयोगाचे एकंदर सामान.
हत्ती (नाम)
सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद.
कावीळ (नाम)
एक रोग ज्यात डोळे,अंग नखे इत्यादी पिवळे होतात.
बट्ट्याबोळ (नाम)
समूळ वा सर्वस्वी नाश.
तितर (नाम)
कावळ्यापेक्षा मोठा, गुबगुबीत, कासर तांबूस रंगाची, लांडी शेपटी असलेला, एक पक्षी."तित्तिर भांडखोर असल्याने ह्या पक्ष्यांच्या झुंजी लावतात".
बेशिस्त (विशेषण)
शिस्त किंवा नियमाचे पालन न करणारा.
भूषण (नाम)
मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू.
अफवा (नाम)
चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
ढेप (नाम)
तीळ,खोबरे इत्यादीकातील तेल काढून घेतल्यावर राहणारा चोथा.
वाडा (नाम)
गुरे, मेंढ्या, शेळ्या बांधण्यासाठी केली जागा.