नोकर (नाम)
वेतन घेऊन सेवा करणारी व्यक्ती.
विचारपूस (नाम)
विचारण्याची क्रिया.
औषध (नाम)
रोगाचे निवारण करणारा पदार्थ.
पार्वती (नाम)
जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
ससाणा (नाम)
घारीपेक्षा लहान आकाराचा, बाकदार चोच आणि तीक्ष्ण नख्या असलेला शिकारी पक्षी.
पाणपोई (नाम)
वाटसरुंना,आल्यागेल्यांना पाणी पाजण्यासाठी केलेली सोय.
पादत्राण (नाम)
पायाला काही लागू नये म्हणून पायात घालायचे कातडी इत्यादी साधन.
ठोक (विशेषण)
सुटे, किरकोळ नव्हे तर अधिक, मोठ्या प्रमाणावरील.
साप (नाम)
सरीसृप वर्गातील एक लांब आकाराचा, सरपटणारा प्राणी.
उंट (नाम)
ओझे वाहण्यासाठी उपयोगात येणारा, मुख्यतत्वे वाळवंटात आढळणारा एक पशु.