पाश (नाम)
रश्शी, तार इत्यादींचा फेरा ज्याच्या मध्ये आल्यावर जीव अडकून जातो आणि जर आवळला गेला तर मरूदेखील शकतो.
बगळा (नाम)
मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
खडतर (विशेषण)
जाता न येण्यासारखे.
उपरणे (नाम)
एकेरी पांघरायचे,अंगावर घेण्याचे वस्त्र.
हिंग (नाम)
एका झाडाचा अतिशय उग्र वास असलेला चीक.
हळवा (विशेषण)
सहज दुखावला जाईल असा.
खैर (नाम)
कातासाठी प्रसिद्ध असलेला उंच व काटेरी वृक्ष.
सोंगटी (नाम)
बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
पेज (नाम)
तांदूळ शिजल्यानंतर भातातील काढलेले पाणी.
व्यापारी (नाम)
व्यापार करणारी व्यक्ती.