सत्यानाश (नाम)
समूळ वा सर्वस्वी नाश.
ससाणा (नाम)
घारीपेक्षा लहान आकाराचा, बाकदार चोच आणि तीक्ष्ण नख्या असलेला शिकारी पक्षी.
दुधारी (विशेषण)
दोन्हीकडे धार असलेला.
कनवट (नाम)
कमरेस बांधलेल्या वस्त्राचा कमरेजवळ खोवण्यात येणारा भाग.
फिरणे (क्रियापद)
एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
कमळ (नाम)
तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
साप (नाम)
सरीसृप वर्गातील एक लांब आकाराचा, सरपटणारा प्राणी.
ठोक (विशेषण)
सुटे, किरकोळ नव्हे तर अधिक, मोठ्या प्रमाणावरील.
दाट (विशेषण)
ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
जबाबदारी (नाम)
एखाद्या विशेष कामासाठी घेतलेला भार.