प्राधान्य (नाम)
सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे.
यज्ञ (नाम)
यज्ञ करण्याची क्रिया.
असीम (विशेषण)
सीमांनी बांधला न गेलेला.
नंदीबैल (नाम)
संकेताने होय, नाही इत्यादी अर्थाने मान हलवण्यास शिकवलेला आणि ज्याला सजवून उपजीविकेसाठी घरोघर फिरवतात असा बैल.
धन (नाम)
सोने,चांदी,रुपये इत्यादी.
बक्षीस (नाम)
एखादे काम यशस्वीपणे केल्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जाणारे धन किंवा वस्तू.
ठाम (विशेषण)
आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा.
ऐकलेला (विशेषण)
जे ऐकलेले आहे असे.
सूर्य (नाम)
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
कापूस (नाम)
कपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.