छत (नाम)
सिमेंट, रेती इत्यादींनी बनवलेले घराचे वरचे आच्छादन.
तेजस्वी (नाम)
इंद्रचा एक पुत्र.
तलवार (नाम)
धातूच्या लांब पात्याला, खाली धरायला मूठ असलेले एक हत्यार.
अरण्य (नाम)
जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण.
गर्दी (नाम)
एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.
चांदवा (नाम)
एक प्रकारचा मासा.
क्रीडा (नाम)
मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.
म्यान (नाम)
तरवार इत्यादींचे घर.
पूर्वज (नाम)
आपल्या अगोदरच्या पिढीतील व्यक्ती.
कमळ (नाम)
तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.