पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अखेर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अखेर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

उदाहरणे : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

समानार्थी : अंत, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

उदाहरणे : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

समानार्थी : अंत, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
३. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

समानार्थी : अंत, इतिश्री, तड, शेवट, समाप्ती

अखेर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : शेवटच्या वेळी.

उदाहरणे : शेवटी त्याला यश मिळालेच

समानार्थी : अंतिमतः, अंती, अखेराला, अखेरीस, शेवटाला, शेवटास, शेवटी, सरतेशेवटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.